‘तृतीय नेत्र’ उलगडत असताना पन्नास-साठ दैदिप्यमान ज्वलज्जहाल भडका आपल्या अंगावर येऊन धडकणार आहे. त्यात एकाहून एक मान्यवर लेखकांचे अग्निबाण, रायफली आणि अदृश्य चेटकिणी यांचा एकच मारा होणार आहे!
तृतीय नेत्र हे पुस्तक लोकल प्रवासात किंवा निवांत दुपारी वाचण्याचे नाही. घरात कुणी नसताना, अपरात्री मंद मेणबत्तीच्या उजेडात वाचावयाचे पुस्तक आहे. बाहेर निसूर शांतता असेल. त्यात कडकडणारी वीज वाजावी किंवा बागेतल्या झाडाची अनिवार सळसळ व्हावी, अशा वेळी वाचावे.कुठेतरी अनवट फडफड – अशा वेळी वाचावे. टॉयलेटचा दिवा लावण्यासाठी स्वीचवर हात नेताना कुणी अक्राळ हसत स्वीचवरील आपले मनगट पकडले तर ? बंद टॉयलेटमधला दिवा आधीच लावून ठेवा मग दार बंद करा. घराच्या ओसरीतही जाऊ नका. विहीरीकडले दार नीट बंद करा.
वाड्यात राहात असाल तर वरच्या मजल्यावर जाऊन रात्री एकट्याने वाचा.
महानगरात राहात असाल तर मध्यरात्री एकांतात वाचा.
मध्यम शहरात राहात असाल तर म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली बसून एकट्याने वाचा.
दहा फुटावरले धपापते कुत्रे तुम्हांला न्याहाळत असताना वाचा.
घरात वाचत असताना खिडकी बंद करू नका.
खिडकी बंद केली तर टकटक नक्की होणार!!
पडदे उघडे ठेवले तर अंधारातून कोणीतरी पाहात असेल.
बंद केलेत तर पडद्यावर सावली येईल.
भुताची गोष्ट असो नाहीतर रहस्यकथा; तिची खुमारी अपरात्रीच्या अपुर्या
उजेडातल्या एकटेपणातच वाढणार!! अंगावर सरसरून येणारा काटा आणि
कानाची हाडे तटाक्कन उभी राहाणे, याशिवाय झटितिप्रत्यय तो कोणता??
- हे केले नाही, तर काही मजा नाही!!
एकदा हे पुस्तक, मी म्हणतो, तसे वाचून पहा!!
प्रो. डॉ. शिरीष गो. देशपांडे
No comments:
Post a Comment